Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा ; जिल्हा प्रशासनाची माहिती !

जळगाव जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा ; जिल्हा प्रशासनाची माहिती !

0
100

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तपणे केले आहे.

इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि पेट्रोल-डिझेल सप्लायर्स यांची एक तातडीची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याद्वारे बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना प्रत्यक्ष भेटी देऊन सद्यस्थितीची खात्री केली आहे. सद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यात इंधनाची कोणतीही कमतरता नाही. पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा असून, अतिरिक्त इंधन साठा सध्या वाहतुकीत मार्गस्थ आहे. त्यामुळे येत्या काळातही पुरवठा सुरळीत राहणार आहे.

नागरिकांनी पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी किंवा लांबच लांब रांगा लावू नयेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला कॅन किंवा बॉटलमध्ये इंधन दिले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound