जळगाव

जळगाव धरणगाव राजकीय

मुख्यमंत्र्यांनी वाहनात बसवुन केली राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा !

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणगाव येथे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. स्वागत झाल्यावर नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी “माझ्यासोबत वाहनात या ” असे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये जळगाव जिल्हा व मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चाही झाली. ना .गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पालकमंत्री शेत पाणंद रस्त्या साठी शेतकऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या वाढत्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी शेतरस्त्यांसाठी कमीत कमी 60 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करणे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे स्मारक व परिसर विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करणे. नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासना कडे […]

आरोग्य जळगाव

आयकर खात्याच्या पथकांची तपासणी सुरूच

जळगाव प्रतिनिधी । आयकर खात्याच्या पथकांनी शहरातील आठ रूग्णालयांची सुरू केलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरूच होती, आजदेखील ही तपासणी सुरू राहणार असल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाच्या नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रूग्णालयांवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून तपासणी केली. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. दरम्यान, ही कारवाई अतिशय गोपनीय पध्दतीत केली जात आहे. याचा कोणत्याही प्रकारचा तपशीर प्रसारमाध्यमांना देण्यात आलेला नाही. शुक्रवारी दिवसादेखील ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. शहरात इतक्या दीर्घ काळापर्यंत कधीही आयकर खात्याचे पथक तळ ठोकून नसल्यामुळे या धाडींमध्ये नेमके काय आढळले ? याबाबत आता तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

जळगाव भुसावळ राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात भाजपमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणगाव व जळगाव येथील दौर्‍यात गुळमुळीत पवित्रा घेत काही लोकप्रिय घोेषणा निश्‍चितच केल्या. मात्र पक्षातील गटबाजीला थांबविण्यात तेदेखील अपयशी ठरले. या अंतर्गत कलहाचा पक्षाच्या आगामी वाटचालीवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धरणगाव व भुसावळ येथे सभा घेतल्या. यात धरणगाव येथे त्यांनी जनजाती संमेलनास संबोधित करून क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या स्मृती आराखड्यासाठी निधीची घोषणा केली. तर भुसावळातील सभेत बेघरांना घरे देण्याची घोषणा करत खासदार रक्षा खडसे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र या दोन्ही सभांमधील विसंगती लक्षात घेण्याची गरज आहे. खरं तर शेतकर्‍यांच्या लाँच मार्चमुळे ना. गिरीश महाजन हे दोन्ही कार्यक्रमांना […]

क्राईम जळगाव

महिलेची चार लाखांच्या दागिन्यांची लांबवली पर्स

जळगाव प्रतिनिधी । गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेची चार लाखांचे दागिने असणारी पर्स लांबविण्याचा प्रकार येथील बस स्थानकात घडला. याबाबत वृत्तांत असा की, प्रमिला विकास बोंडे (वय ५२, रा. पोस्टल कॉलनी खंडवा) ही महिला गुरूवारी दुपारी तिची नणंद भारती किशोर महाजन यांच्यासोबत बामणोद येथून जळगावात सोने खरेदीसाठी आल्या होत्या. सोने खरेदी केल्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास त्या बामणोद येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर पोहोचल्या. त्या दोघी जळगाव-भुसावळ बसमध्ये बसल्या. परंतु, गर्दी असल्याने त्या बसमधून खाली उतरल्या. त्यानंतर जळगाव-कठोरा या बसमध्ये दोघी बसल्या. दरम्यान, बसमध्ये बसत असताना बोंडे यांना त्यांच्याजवळील लाल रंगाच्या बॅगची चैन उघडी असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ बॅगमधील दागिने तपासले. […]

क्राईम जळगाव

जळगावात दोघांवर ब्लेडने वार

जळगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे एका तरूणाने दोघांवर ब्लेडने वार केल्याची घटना शहरात घडली. विनोद गोंविदा बिर्‍हाडे (वय २२) व विकास वामन बिर्‍हाडे (वय २३, दोघे रा. पिंप्राळा हुडको) हे दोन तरुण सराफ बाजारातील गटारींमध्ये सोन्याचे कण शोधण्याचे काम करतात. रवी गोपाळ सोनवणे उर्फ ब्लेड रव्याने दारू पिण्यासाठी विनोद व विकास यांना पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्यामुळे त्याने खिशातून ब्लेड काढून दोघांवर वार केलेे. यात विनोद हा गंभीर जखमी झाला. सोबतच्या तरुणांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरा रव्याला ताब्यात घेतलेे. […]

क्रीडा जळगाव

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ब्रिगेडीयर अनंत नागेंद्र कमांडो रन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आर.बी.गुप्ता, फार्मोकोलॉजी डॉ. बापूराव बीटे, नाक-कान-घसा तज्ञ डॉ. विक्रांत वझे, डॉ. विठ्ठल शिंदे, आशिष भिरूड, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रवीण कोल्हे, फिजिओथेरपीचे राहुल गिरी हे उपस्थित होते. एकूण पाच किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये संग्राम वाघ प्रथम, अनिरुध्द लहाडे द्वितीय, कृष्णा चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये सिध्दी धिंग्रा प्रथम, रूपाली ढोले द्वित्तीय, श्रेया जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. प्राध्यापक कर्मचारी गटात प्रमोद […]

जळगाव सामाजिक

महिला महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्र

जळगाव प्रतिनिधी । अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचालित कला, वाणिज्य व गृह विज्ञान महिला महाविद्यालयात २३ व २५ फेब्रुवारी रोजी दोन राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्या जयश्री नेमाडे यांनी दिली. शहरातील महिला महाविद्यालयात २३ फेब्रुवारी रोजी बौद्धदिक संपदा हक्क : स्वरूप आणि समस्या याविषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी १० वाजता महिला विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. मीना कुटे यांच्या हस्ते होईल. त्या पेटंट, ट्रेडमार्क आणि बौद्धदिक क्षमता या विषयावर मार्गदर्शन करतील. याप्रसंगी अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचेही भाषण होणार आहे. तर चर्चासत्रात माजी प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील, डॉ. सुरेश मैंद मार्गदर्शन करतील. २५ रोजी […]

जळगाव राजकीय

गाळेधारकांना दिलासा;महासभेत ना.महाजन व आ.भोळेंच्या नावाचा जयघोष

जळगाव (प्रतिनिधी) येथील मनपाच्या मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत भाड्याच्या रकमेपोटी पाचपट दंड वसूल करण्याचा निर्णय तत्कालिन महासभेने घेतला होता. अखेर सत्ताधारी भाजपाने भाजपाने पाचपट दंडाचा निर्णय रद्द करून थकी भाड्यावर २ टक्के शास्ती लावण्याचा निर्णय विरोधकांच्या विरोधाला न जुमानता मंजूर केला. यानंतर भाजप नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या नावाने विजयी घोषणा दिल्यात. दरम्यान,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आजची महासभा नियोजित वेळेपेक्षा अर्धातास उशिराने सुरु झाली. महापौर सिमा सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या दुसर्‍या मजल्यावर महासभा घेण्यात आली. यावेळी व्यासपिठावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव गोराणे आदी उपस्थित होते. महासभेत नगरसेविका भारती कैलास सोनवणे यांनी […]

जळगाव राज्य

जिल्ह्यातील ११ तहसीलदारांच्या बदल्या

जळगाव (प्रतिनिधी) आज एका शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ११ तहसीलदारांची बदली करण्यात आली असून त्यांना आजच कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी लगेचच नव्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून ते आपला पदभार लवकरच स्वीकारतील. बदली झालेल्यांमध्ये यावल येथील तहसीलदार कुंदन हिरे यांची धुळे येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी मालेगाव येथून धान्य वितरण अधिकारी पदावर असलेले जितेंद्र कुंवर हे नवे तहसीलदार म्हणून येत आहेत .   भुसावळ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची नंदुरबार येथे बदली झाली असून त्यांच्या जागी त्र्यम्बकेश्वर नाशिक येथून महेंद्र पवार हे येत आहेत. पाचोरा तहसीलदार बंडू कापसे यांची कळवण येथे बदली झाली असून […]

जळगाव शिक्षण

आयएमआरचे सिनर्जी स्नेहसंमेलन उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई सोसायटीच्या आय.एम.आरच्या सिनर्जी २०१८-१९ या वार्षिक महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. यात माधुरी बिर्ला हिला स्टुडंट ऑफ द इयरने गौरवण्यात आले. या दोन दिवसीय संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीए पल्लवी मयूर, केसीई सोसायटीचे अकॅडमिक डायरेक्टर प्रा.डॉ. डी.जी. हुंडीवाले, आयएमआरच्या संचालिका प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. यशस्वी आयोजनासाठी संचालक डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा पाठक, प्रा. रूपाली नारखेडे, प्रा.विवेक यावलकर, प्रा.उत्कर्ष चिरमाडे, प्रा. रंजना झिंजोरे, प्रा.अमोल पांडे, प्रा.डॉ.शुभदा कुलकर्णी, प्रा.स्वप्नील काटे, प्रा. नितीन खर्चे, प्रा. तनुजा फेगडे , प्रा.विजय पाटील, प्रा. श्‍वेता चोरडिया, प्रा.चंद्रशेखर वाणी, प्रा.प्रकाश बारी, प्रा.पराग नारखेडे, प्रा.एस.एन. […]