Home क्राईम अश्लिल चाळे करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; नराधमाविरोधात गुन्हा दाखल

अश्लिल चाळे करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; नराधमाविरोधात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. याच परिसरात राहणारा संशयित आरोपी गणेश नाना कोकाटे याने पीडित मुलीला काहीतरी कारणाने त्याच्या घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच आरोपीने तिच्यासोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी गणेश कोकाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound