Home क्राईम ब्रेकींग : आकाशवाणी चौकात भीषण अपघातात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग : आकाशवाणी चौकात भीषण अपघातात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे.

यावेळी नागरीकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही.

याबाबत अधिक असे की, महाबळकडून जळगाव शहरात अनोळखी व्यक्ती हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २७५२) ने जात असतांना पाळधीकडून भुसावळकडे जाणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीबी ७६४२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २५ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक ताब्यात घेतला आहे. तर खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. नातेवाईकांनी ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.


Protected Content

Play sound