पहूर येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भ्रष्टाचार निर्मूलनासाठी माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका मुख्य संघटक शंकर भामेरे यांनी केले . येथील पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी माहिती अधिकार अत्यंत प्रभावी माध्यम आहे. माहिती अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो .

आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक सुरेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जामनेर तालुका मुख्य संघटक शंकर भामेरे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी मार्गदर्शन केले . याप्रसंगी शालेय ग्रंथालयाला माहिती अधिकार मार्गदर्शिका भेट देण्यात आली . मुख्याध्यापक सुरेश सोनवणे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. संस्था प्रतिनिधी तथा वरिष्ठ लिपिक किशोर पाटील , ज्येष्ठ शिक्षक मधुकर आगारे , एस . एस . पाटील , विजय बोरसे , गोपाळराव थोरात यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . आर .टी .देशमुख यांनी सूत्रसंचालन केले .

महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला .प्रारंभी थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख , पर्यवेक्षिका कल्पना बनकर , ज्येष्ठ शिक्षक अमोल क्षीरसागर यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते . किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले भगवान जाधव यांनी आभार मानले .

Protected Content