पाच लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील कापसे नगरातील माहेरवाशीणीला निफाड येथे सासरी दूध व्यवसाय वाढवण्यासाठी माहेराहून 5 लाख रुपये आणावे या मागणीसाठी अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण करत छळ केल्याचा प्रकार मंगळवारी ७ मे रोजी समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील कापसे नगरातील बाहेर असलेल्या सुनंदा विकास बोरसे वय-25 यांचा विवाह नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील विकास माधव बोरसे यांच्याशी झालेला आहे. दरम्यान दुधाचा व्यवसाय वाढवण्यासाठी बाहेरून ५ लाख रुपये आणावे, त्यासाठी विवाहितेला अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण करत छळ केला. तसेच सासू आणि सासरे यांनी देखील पैशांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी कापसे नगर येथे निघून आल्या. दरम्यान त्यांनी मंगळवार ७ मे रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार पती विकास माधव बोरसे, सासरे माधव बोरसे आणि सासू बेबाबाई बोरसे सर्व राव रा. निफाड ता. नाशिक यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश पाटील हे करीत आहे.

Protected Content