जुन्या व किरकोळ कारणावरून तरूणाला फायटरने मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या व किरकोळ वादातून चाळीसगाव तालुक्यातील चिंचोली गावातील येथे एका तरूणाला शिवीगाळ करत फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी ६ मे रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी रात्री १० वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, मानस उर्फ सनी संजय अहिरे वय १९ रा. चाळीसगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ६ मे रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मानस हा चाळीसगाव तालुक्यातील चिंचोली गावात असतांना गौरव सोनवणे, रितेश उर्फ कांबो राजपूत आणि चेतन गोल्हार तिघे रा. चाळीसगाव हे तिथे आले. त्यानंतर जुन्या व किरकोळ वादातून मानस अहिरे याला शिवीगाळ करत फायटरने बेदम मारहाण करून जाखमी केले. याप्रकरणी मानस अहिरे याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ७ मे रोजी रात्री १० वाजता गौरव सोनवणे, रितेश उर्फ कांबो राजपूत आणि चेतन गोल्हार तिघे रा. चाळीसगाव यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.

Protected Content