ग्रामपंचायतीची फसवणूक करणारा ठेकेदाराच्या मुसक्या आवळल्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विकास कामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापनाचे साहित्य न पुरवता जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीची फसवणुक करणार्‍या ठेकेदाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भास्कर मार्केटमधून मुसक्या आवळवून जेरबंद केले.

 

विरेंद्रकुमार राजेंद्र पाटील रा. मायादेवी मंदिरामागे महाबळ असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीचे  ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसंदर्भात विरेंद्र कुमार पाटील याला कामाचा मक्ता दिला होता. या कामासाठीचे ५ लाख ५७ हजार १०० रुपये वीरेंद्र कुमार याने घेतले मात्र प्रत्यक्ष विकासकामांसाठी लागणारे  साहित्य पुरवलेच नाही. त्यामुळे  याप्रकरणी वीरेंद्र कुमार पाटील याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच वर्षभरापासून संशयित वीरेंद्रकुमार हा फरार होता.  संशयित जळगावातील भास्कर मार्केट परिसरात असल्याची गोपनीय माहिती शनिवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

 

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अशरफ शेख, सुनील  दामोदरे ,लक्ष्मण पाटील, रणजित जाधव ,किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने  संशयित वीरेंद्र कुमार याच्या भास्कर मार्केट परिसरातून मुसक्या आवळल्या त्याला पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!