हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्यावर कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नहाटा चौफुली परिसरात हातात सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी सोमवारी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी मध्यरात्री १ वाजता एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील नहाटा चौफुली परिसरात संशयित आरोपी आनंद विजय सारवान वय २० रा. अकलुद ता. यावल हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. बाजारपेठ पोलीसांनी सोमवारी ६ मे रोजी रात्री ११.३० वाजता कारवाई करत संशयित आरोपी आनंद विजय सारवान वय २० रा. अकलुद ता. यावल यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत करून ताब्यात घेतले. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी मध्यरात्री १ वाजता पोलीस कॉन्स्टेबल अमर आढाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आनंद विजय सारवान वय २० रा. अकलुद ता. यावल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासिन पिंजारी हे करीत आहे.

Protected Content