Home क्राईम मुंबईत सामुहिक बलात्कारानंतर तरुणीची हत्या

मुंबईत सामुहिक बलात्कारानंतर तरुणीची हत्या

0
108


 

Rape2 678x381
 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतही सांताक्रुझ परिसरात एका तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा उघड झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणी वाकोला पोलिसांनी पिडीत तरूणीच्या जवळच्या दोन मित्रांना अटक केली आहे. मृत तरुणी ही सांताक्रुझमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहायची. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन तरुणांनी पीडित तरुणीला त्यांच्या खोलीत बोलवत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर तिला बेदम मारहाण केली. पिडीत तरुणी आरडा-ओरडा करायला लागल्यानंतर त्यांनी उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. दरम्यान, खोलीत राहणारा तिसरा तरुण रात्री घरी आल्यानंतर त्याला तरुणीचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ चाळीतील इतर रहिवासी आणि पोलिसांना माहिती दिली.


Protected Content

Play sound