जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार व माननीय एम क्यू एस एम शेख साहेब, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव येथे दि. २८/०९/२०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली, सदर राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण रक्कम रू.१,१९,४८,७८२/_(एक कोटी एकोणवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बेहान्शी मात्र) वसुली करून पक्षकारांना वितरित करण्यात आले.
पक्षकारांनी सामंजस्याने प्रकरणे आपसात मिटविली ज्यात प्रामुख्याने बैंकींग, इन्शुरन्स, पतसंस्था यांचे प्रकरणे समाविष्ट होती. लोक अदालतचे पॅनल प्रमुख म्हणून आयोगाचे म. अध्यक्ष श्रीमती छाया आर. सपके, सदस्य म्हणून आयोगाचे म. सदस्य श्रीमती प्रतिभा आर. पाटील आणि श्री. संजय माणिक यांनी कामकाज पाहीले. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ऐड. हेमंत भंगाळे व सर्व वकील मंडळींनी सहकार्य केले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.