मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी (लेखाशीर्ष 2515 1238) या योजनेअंतर्गत विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून, याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत शासन निर्णय क्रमांक विकास-2024/प्र.क्र.168/ भाग-3/योजना-6 दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी मंजूर झालेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर मतदारसंघातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने आमदार पाटील यांनी सुचवलेल्या मतदार संघातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून, सदर शासन निर्णय सन 2024-25 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून मतदार संघातील विकास कामांसाठी एकूण 6 कोटी रुपये इतक्या रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने व सार्वजनिक बांधकाम विभागांना निधी वितरणासाठी मंजूर कामांचा निधी एलपीआरएस प्रणाली द्वारे वितरित करण्यात येणार आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झालेली कामे खालील प्रमाणे:- मौजे जुनोना येथे संत बाळू मामा मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष, मौजे मनुर खुर्द येथे श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष, मौजे करंजी येथे विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड १५ लक्ष, मौजे नाडगाव येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे ता.बोदवड १० लक्ष, मौजे रेवती विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष, मौजे भानखेडा येथे लक्ष्मण नगरमध्ये डांबरीकरण करणे ता.बोदवड १० लक्ष, मौजे मनुर बु येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ता.बोदवड १८ लक्ष, मौजे येवती अंबऋशी मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे ता.बोदवड १० लक्ष, मौजे नांदगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता. बोदवड १० लक्ष, मौजे चिखली बु. येथे श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे ताबोदवड १० लक्ष, मौजे तरोडा येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, मौजे शेलवड येथे प्रभाग क्र. १ शौचालय बांधकाम करणे ता.बोदवड ५ लक्ष, मौजे भोटा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ सुशोभिकरण करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, मौजे सुदगाव येथे गटार बांधकाम करणे व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे मस्कावद सिम येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे गोलवाडे येथे श्री हनुमान मंदिराजवळ सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे पुरी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे सातोड येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, मौजे तांदलवाडी येथे पेव्हरब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष, मौजे मांगलवाडी येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे निंबोल येथे गावांतर्गत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे २९ लक्ष, मौजे कोळोदा येथे विठ्ठल मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे शिंगाडी येथे गावांतर्गत डांबरीकरण करणे ता.रावेर १० लक्ष, मौजे रेंभोटा येथे विठ्ठल मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.रावेर २० लक्ष, मौजे वाघाडी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष, निमखेडी खु.गट क्र.132 ला संरक्षण भिंत बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, मौजे खिर्डी बु. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.रावेर २९ लक्ष, वाघोदा बु.येथे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.रावेर २९ लक्ष, ढोरमाळ येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, वाघोदा बु. येथे चंदन महाजन ते राजाराम हिरामण महाजन यांच्या घरापर्यंत पेव्हरब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष, मौजे पिंप्रीपंचम येथे सभामंडप उभारणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, मौजे मानेगाव ता.मुक्ताईनगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, तालखेडा येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष, मौजे वाघोदा बु.येथे गट नं.३०१/अ या खुल्या जागेत सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर २० लक्ष, मौजे खिर्डी खु.शादिखाना हॉल बांधकाम करणे ता.रावेर २० लक्ष, मौजे कुऱ्हा हरदो येथे शिवव्दारा जवळ सुशोभीकरण करणे