भालेर येथे शहीद शिरीषकुमार फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

नंदुरबार, प्रतिनिधी । नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे शहीद शिरीषकुमार फाउंडेशन भालेर यांच्या वतीने शहीद शिरीष कुमार फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 

 

शहीद शिरीषकुमार फाउंडेशनच्या टीमने मागच्या १ वर्षापासून कोरोनाच्या काळात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले.. कोरोनाबद्दल जनजागृती, गाव निर्जंतुकीकरण, वृक्षलागवड, स्मशानभूमीची साफसफाई आदी  अनेक समाजपयोगी कामात फाउंडेशनची टीम नेहमी अग्रेसर असते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून माजी पर्यवेक्षक पी. पी. बागुल, देवा नाना,राजेंद्र पाटील(माजी सैनिक), विनोद बागुल, राजेंद्र बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामेश्वर पाटील यांनी शहीद शिरीष कुमार फाउंडेशनच्या कार्याची रूपरेषा मांडली. पी पी.बागुल यांनी जिद्द इच्छाशक्ती आणि सहकार्य यांच्या जोरावर आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे सांगत फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. गावातील मान्यवरांनी फाउंडेशन ला मदत व सहकार्य केले .  सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव रामेश्वर पाटील यांनी केले तर उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी आभार मानले.  यशस्वीतेसाठी सागर आभणे, नितीन बागुल,  संदीप पाटील, नितीन पाटील, गणेश बागुल,  सुमित बागुल, महेश पाटील, विशाल बागुल आदींनी सहकार्य केले.

 

Protected Content