भारतीय मानवाधिकार परिषदेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी डॉ. राम जाधव

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतनगर येथील रहिवासी डॉ. राम जाधव यांची भारतीय मानवाधिकार परिषदेच्या  नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल शहादा प्रार्थना फाउंडेशनचे चेअरमन डॉ. लक्ष्मण सोनार, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे नंदुरबार जिल्हा निमंत्रक एकनाथ पाटील, प्रसन्न कुमार बंब, खेडीदिगर येथील मोरे हॉस्पिटलचे डॉ. मुकेश मोरे, डॉ. अविनाश तडवी, खेतियाचे डॉ. घनश्याम पाटील, डॉ. मनोज, डॉ. विलास पवार, डॉ. रमेश जाधव, प्रवीण पाटील, डॉ. अजय निकुंभ, डॉ. राजु पवार, भातकी ग्रामपंचायतचे सरपंच विरेंद्र रावताले, उपसरपंच मगन पाटील तसेच पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा ग्रामपंचायतीचे सरपंच राजु जाधव व उपसरपंच शाम भाऊ जाधव तसेच संपूर्ण जाधव परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Protected Content