धक्कादायक : मामाकडे आलेल्या मुलाने केलं असं काही… घरातील सर्वांनाच बसला धक्का

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मामाच्या घरी आलेल्या दहावीच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १० मे रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वप्नील दीपक पाटील (१५, रा. बाळद, ता. पाचोरा) असे या मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील बाळद येथे स्वप्निल पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. स्वप्नील पाटील हा उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. शुक्रवार १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यावेळी आजीने इतरांना बोलवले व दरवाजा तोडला.

तेव्हा, स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी घरातील सर्वांनाच धक्का बसला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Protected Content