पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात अचानक पाऊस आला आहे. त्यामुळे पुण्यातील हडपसर परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात रोड शो केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र रोड शो सुरु असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
पावसामुळे कोणताही व्यत्यय न येऊ देता, अजित पवारांनी रोड शो सुरुच ठेवला. पावसात आम्हाला भिजायची सवय आहे. त्यामुळे पावसात रोड शो करण्याच फार विशेष नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. लोकांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो, त्यामुळे पावसात एवढे लोक रोड शोला आले आहेत. कोंढवा, लुल्लानगर, साळुंखे विहार, कौसरबाग, कात्रज गावठाण, कात्रद चौक, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रूक नगर, गोखलेनगर आदी परिसरात हा रोड शो झाला. हडपसर भागातील या रोड शोमध्ये महायुतीमधील सर्वं सभासद उपस्थित होते.