


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरातील एका विहिरीत अनोळखी अंदाजे ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरातील एका विहिरीत अनोळखी अंदाजे ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून तरूणांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ओळख पटेल असे कोणतीही कागदपत्र किंवा माहिती समोर आलेली नाही. पंचनामा करून मृतदेह भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.


