Home क्राईम धक्कादायक : अत्याचारातून महिला गर्भवती; नराधमाला अटक

धक्कादायक : अत्याचारातून महिला गर्भवती; नराधमाला अटक

0
104

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|  जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे कौटुंबिक कारणावरून त्यांच्या पतीसोबत नेहमी भांडण होत असल्याचा गैर फायदा घेवून संशयित आरोपी तुषार राजेंद्र अहिरे वय- २८ याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून विवाहिता गर्भवती झाली. त्यानंतर त्याने विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार मे २०१८ पासून सुरू होता. या प्रकारानंतर महिलेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तुषार राजेंद्र अहिरे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तुषार अहिरे याला अटक करण्यात आली. पुढील तपास डीवायएसपी संदीप गावीत हे करीत आहे.


Protected Content

Play sound