भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील कवाडे नगरातील एका भागात राहणाऱ्या एका महिलेचा हात पकडून मारहाण करत विनयभंग केला तर तिचा भाऊ आईवडील यांना मारहाण करून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडला आहे. याप्रकरणी गुरूवार १० ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील कवाडे नगरातील एका भागात २२ वर्षीय महिला ही आपल्या भाऊ, आईवडील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. दरम्यन याच भागात राहणारे लखन परदेश वय २६ आणि करण परदेशी वय २४ दोन्ही रा. कवाडे नगर, भुसावळ यांनी बुधवार ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता काहीही कारण नसतांना महिलेचा हात पकडून मारहाण करत विनयभंग केला. तसेच महिलेचा भाऊ आणि आईवडील यांना मारहाण करून दमदाटी केली. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी लखन परदेश वय २६ आणि करण परदेशी वय २४ दोन्ही रा. कवाडे नगर, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समिना ताडवी ह्या करीत आहे.