अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुर्गा विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळीत असताना झालेल्या दगडफेकीत सहा जण जखमी झाले. तर रात्री कोणाविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही गटाच्या २०० ते ३०० महिला पुरुषांनी चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तेव्हा संध्याकाळी परसपर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले. दरम्यान दिवसभर गावात तणावसदृश्य परिस्थीती होती. १४ रोजी संध्याकाळी सहा वाजता गावात त्याच दोन गटात पुन्हा वाद निर्माण झाल्याने पोलिसांचा फौजफाटा धानोरा गावी रवाना झाला.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, रविवारी १३ रोजी रात्री ८ वाजेच्य सुमारास दुर्गा विसर्जन मिरवणुक सुरू असताना मिरवणूक पाहण्यासाठी उभे असलेल्या महिला व पुरुष लहान मुले असतांना महर्षी वाल्मीक मित्र मंडळ हे दुर्गा देवी मिरवणुक घेवुन सुर्यवंशी गुर्जर समाज सतपंथ ज्योत मंदिर जवळ आले. त्यांच्या मंडळातील लोक हे गुलाल उधळत असतांना त्यांना बोलते कि लहान मुलांना त्रास होईल म्हणून तुम्ही गुलाल पुढे जावुन उधळा परंतु त्यांनी काहीएक न ऐकता पुन्हा गुलाल मंदिरावर फेकली तुम्ही ईथे गुलाल उधळू नका असे बोलण्याचा त्यांना राग आल्याने सदर लोकांनी गुलाल उधळत असतांना त्यामध्ये दगड फेक केली त्यात मंदिरा जवळ असलेले गर्दी मध्ये जखमी किशोर कमलाकर चौधरी यांच्या डोक्यास, चेतन देविदास महाजन यांच्या गालावर, प्रविण जगतराव पाटीत यास डोळ्याच्या वर लागुन जखमी झाले आहे. म्हणून फिर्यादी यांनी सदर वाल्मीक मित्र मंडळातील लोकांना विचारले कि तुम्ही दगड फेक का करत आहे तेव्हा त्यांनी आम्हाला सांगीतले कि तुम्ही आम्हाला गुलात का उधळू देत नाही. म्हणून आम्ही दगड फेक केली म्हणून अडावद पोलीस स्टेशनला गजानन लोटु चौधरी (६२) व्यावसाय शेती रा. धानोरा याचे फिर्यादीरून प्रताप भादु कोळी, चंद्रभान गोकुळ कोळी, निलेश शांताराम कोळी , जयेश सुरेश कोळी, दिपक कोळी, योगेश कोळी, आकाश शंकर कोळी, गोकुळ धुडकू कोळी, ज्ञानेश्वर रामदास कोळी, प्रल्हाद माधव कोळी , शुभम संतोष कोळी, राजु चुनिलाल कोळी, नितेश सुभाष कोळी, आकाश सुनिल कोळी, भिमराव सपकाळे, अजय गोबा कोळी, वैभव भोला कोळी व इतर दहा ते वीस सर्व रा. धानोरा ता. चोपडा यांचे विरुद्ध भा.न्या.सं. कलम ११८(१), १८९(२), १९१(१), १९०, मुंबई पोलीस अधिनियम ३६(१) चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनवर तडवी हे करीत आहेत.
दुसऱ्या गटातील योगेश्वरी रविंद्र कोळी (वय-३५) धंदा मजुरी रा. धानोरा यांनी दिलेल्या फिर्यादीरून किशोर लिलाधर चौधरी, किशोर देविदास महाजन, पन्नालाल केशरलाल महाजन, गजानन लोटु चौधरी, नितिन राजकपुर पाटील, संदिप पदमाकर चौधरी, शुभम ईश्वर पाटील, कुलदिप हितेंद्र पाटील, रत्नाकर प्रभाकर पाटील, शेखर कैलास पाटील, मयुर कैलास पाटील, अक्षय कैलास पाटील, प्रितम ईश्वर पाटील, नितिन वसंत महाजन, चेतन राजू पाटील, नयन नंदुलाल महाजन, जगदिश शंभुदास महाजन, नवल पितांबर महाजन, दिपेश श्रावण महाजन, प्रदिप निळकंठ महाजन, खुशाल गजानन चौधरी, हितेश रविंद्र पाटोल, उदधव महेश महाजन, प्रितम प्रदिप महाजन, मंथन चौधरी, वैभव दिलीप महाजन, अमोल नरेश पाटील, देवेंद्र बाळु परमार, भूपेंद्र बाळु परमार, वसंत मोतीलाल महाजन, परासर देविदास महाजन, किरण विजय महाजन, जयेश धनराज चौधरी, गजानन आनंदा गुजर, मयुर किरण पाटील, गौरव केशरलाल महाजन, दिपक निळकंठ चौधरी, अजय कैलास पाटील, धनराज नामदेव महाजन, हर्षवर्धन दिपक चौधरी, वैश्यु नागेंद्र महाजन, चेतन नागेंद्र महाजन, प्रमोद राजकमाल पाटील, भोला दिपक महाजन, कुलदिप बाळु महाजन, सागर अनिल महाजन, मुन्ना दुलचंद महाजन, किरण पंडीत महाजन, नवल एकनाथ गुजर, ललित भिका महाजन, चेतन संजय महाजन, धनंजय विष्णु पाटील, योगेश आबा पाटील, सागर वसंत पाटील, चेतन देविदास पाटील (टेलर), दिलीप बाजीराव महालन, गिरीष दिप महाजन, सागर अशोक पाटील, अभय सुरेश महाजन, अनिल दुलचंद महाजन, भावेश रामचंद्र महाजन, बबलू गुजर (दंगा पथक), मुन्ना बापु महाजन, धिरज अरुण महाजन, निखिल संजय महाजन, मोहित संजय महाजन, मच्छिद्र वासुदेव महाजन, भैय्या माणीकचंद महाजन, रवि टेलर, सरेंद्र पुरुषोत्तम महाजन, पराग रविद्र महाजन, धनंजय प्रताप महाजन, सरिता दिपक चौधरी, चंदाबाई रामा गुजर, मेघा विजय चौधरी, सुनिल छगन पाटील (सर), दिपमाला महेंद्र पाटील, दिनेश विजलाल पाटील, वसंत मोतीलाल महाजन, अमोल पाटील (पेटर) अशांनी जमाव जमा करुन शिविगाळ करुन दगडफेक केली त्यात १) मनोज आधार कोळी, २) भुषण शांताराम तायडे, ३) दिपक एकनाथ कोळी, ४) जयेश सुर्यकांत साळुंके, ५) चेतन दिलीप साळुंके, अशांना दगड लागून दुखापत झाली असुन वरिल लोकांनी ६) शानुबाई मधुकर सैंदाणे, ७) ज्योती जिवन साळुके, ८) निर्मलाबाई ईश्वर इंगळे, ९) आशाबाई प्रदिप सोनवणे, १०) प्रमिलाबाई कैलास सांळुंके, ११) सुनंदाबाई सुरेश भिल्ल, इतर महिला अशांनासुध्दा लाथा बुक्यांनी मारहाण केली. असुन त्यांना सुध्दा किरकोळी दुखापत झाली आहे. म्हणून सर्व लोकांविरुध्द दंगलीचा तसेच अनुसुचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.