चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द गावात अनैतिक संबंधात झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अडावद पोलीस ठाण्यात खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, चोपडा तालुक्यातील गोरगावले गावात ४५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. तिचे गावातील अनिल विरजी पावरा वय ३५ याच्या सोबत बऱ्याच वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यातून दोघांमध्ये सारखी भांडण होत होती. याच कारणावरून २४ सप्टेंबर रोजीच्या रात्री १० ते २५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी अनिल पावरा ह्याने कशानेतरी गळा आवळून खून केला. ही घटना सकाळी ५ वाजता उघडकीला आल्यानंतर अडावद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. पोलीसांनी संशयित आरोपी अनिल पावरा याला अटक केली आहे. याप्रकरण मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल वीरजी पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहे.