यावल/चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्थेची वाट लावणाऱ्या बदलापुरसह अनेक उदाहरणे समोर असतांना त्यातच चोपडा तालुक्यात शेतातुन घरी येत असतांना १२ वर्षीय चिमकुलीवर एका नराधमाने अत्याचार तिचा निघृण खुन केल्याची घटना घडली असुन त्या वासनेच्या बळी पडलेल्या चिरमुडया मुलीला न्याय मिळावा या मागणीचे निवेदन एनएसयुआयच्या वतीने चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले आहे.
या संदर्भात एनएसयुआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी चोपडा येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,चोपडा येथील रहिवाशी असलेल्या दोन बहिणी काम करून शेतातून घरी परत येत असतांना १२ वर्षीय एका मुलीवर मौजे विरवाडे तालुका चोपडा शिवारातील एका नराधमाने तिला शेतामध्ये ओढून नेऊन त्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण खुन केला व त्यानंतर संशयिताने विवस्त्रअल्पवयीन मुलीला घटनास्थळापासून कापसाच्या शेतात ओढत नेत फेकून दिल्याची घटना उघडकीस आलेली आहे.
या घटनेचा एन.एस.यु.आय.चे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्यासह एन.एस.यु.आय.चे सदस्य यांनी या संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात असुन,तसेच दोषी असणाऱ्या त्या नराधम आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्वरित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व मयत मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा यासाठी चोपडा तहसीलदार थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी सोबत भुपेंद्र जाधव, (एन.एस. यु.आय जिल्हाअध्यक्ष), चेतन बाविस्कर (एन.एस.यु.आय प्रदेश सरचिटणीस) घनश्याम पाटील(एन.एस.यु.आय जिल्हा उपाध्यक्ष),सकलेन शेख,टेनू सोनार व एन.एस.यु.आय मित्रपरिवार उपस्थित होता.