मुक्ताईनगरात उपजिल्हा रूग्णालयातील गणेश मूर्तीचे विसर्जन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रूग्णालय येथे वैद्यकिय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली होती. पाच दिवसीय गणेश गणेश मूर्तीचे विसर्जन संत मुक्ताई जुनी कोथळी येथील पूर्णा नदीच्या पात्रात करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी डॉ योगेश राणे, डॉ.निलेश पाटील, डॉ राहुल ठाकोर, डॉ प्रविण बोदडे, डॉ. अजिंक्य वराडे, डॉ.गजानन परखड, डॉ पारितोष कुरुंद, डॉ शोएब खान, डॉ भूषण पाटील, डॉ. माधुरी तायडे, सहाय्यक अधीसेविका आशा चिखलकर,परिसेविका कल्पना नगरे व रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content