Home क्राईम विहिरीत पाय घसरून पडल्याने वृध्द महिलेचा बुडून मृत्यू

विहिरीत पाय घसरून पडल्याने वृध्द महिलेचा बुडून मृत्यू

0
185

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विहिरीतील पाणी घेण्यासाठी गेलेल्या वृध्द महिलेचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जनाबाई शिवराम कोल्हे वय ७८ रा. पातोंडा ता.चाळीसगाव असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जनाबाई कोल्हे या वृध्द महिला आपल्या परिवारासह पातोंडा गावात वास्तव्याला आहे. शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी गावातील बापू विठ्ठल पाटील यांच्या शेतातील विहीरीजवळ पाणी काढण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाय घसरला व त्या विहिरीत पडल्या त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पाहेकॉ पंकज पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound