चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चरित्र्याच्या संशयावरून एका तरूणाने पत्नीच्या तोंडात कापडाचा बोळा घालून दोरीने आवळून खून केला त्यानंतर स्वत: गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल सत्तरसिंग पावरा उर्फ बारेला वय ३० हा तरूण आपल्या पत्नी लक्ष्मीबाई गोपाल पावरा वय २६ हिच्या सोबत चाळीसगाव तालुक्यातील तळोदा येथील शिवाजी शामराव पाटील रा. पिंप्री ता.चाळीसगाव यांच्या तळोदा शिवारातील शेतात वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून पती व पत्नी यांच्यात वाद सुरू होता. या मुळे त्यांचे नेहमी घरात भांडण होत होते. गोपाल हा आपल्या पत्नीवर नेहमी चरित्र्यांचा संशय घेत होता. सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन्ही पती पत्नी घरी असतांना गोपाल याने पत्नी लक्ष्मीबाई पावरा हिला तोंडात कापडाचा बोळा कोंबून दोरीने गळा अवळून खून केला. त्यानंतर भीतीपोटी त्याने स्वत: दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेमुळे चाळीसगाव तालुका हादरला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत गोपाल पावरा यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा्यक पोलीलस निरीक्षक प्रविण दातिर हे करीत आहे.