चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक बातमीसमोर येत आहे. एका १९ वर्षीय तरूणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जुलै २०२४ मध्ये तरूणीला गावात राहणारी पूजा शेळके हिनी घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावून घेतली. यावेळी रूममध्ये आधीच येवून बसलेला समाधान बाळू शेळके याने तरूणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कुणाला सांगितला तर भाऊ व आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी समाधान शेळके हा दारू पिऊन आल्यानंतर तरूणीचा हा पकडून आंगावर ओढले. हा प्रकार तरूणीच्या आईवडीलांसमोर झाला. दरम्यान पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहे.