अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खेडेगावात घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी हातसफाई करण्याचे काम सुरू केले आहे. अमळनेर तालुक्यातील अशा एका गावात धुमधडाक्यात खौशी गावात एकाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे असा एकुण ५० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कीख्, जिजाबराव उत्तम शिरसाट (वय-५५, रा. खौशी ता. अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना त्यांचे बंद घराचा दरवाजाचे कडी कोंयडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ४७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना समोर आल्यानंतर जिजाबराव शिरसाठ यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहे.