यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचा खो-खो व क्रिकेट संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत नुकत्याच यावल तालूकास्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धा विविध ठिकाणी सुरू आहेत. त्यात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा भारत विद्यालय न्हावी येथे घेण्यात आल्या.
त्यात किनगाव इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षाआतील मुलींच्या खो-खो संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करत जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान मिळवले तर जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल फैजपूर येथे झालेल्या १७ वर्षाआतील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत मुले व मुलींच्या संघानी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चीत केले आहे.
विजयी संघाचे संस्थेचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनिष विजयकुमार पाटील मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील उपमुख्याध्यापक सुहास भालेराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.