यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील नगर पालिकेचे कारनामे प्रत्येकाच्या घरी नगर परिषद कर्मचारी घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती, शैक्षणिक कर, अग्निशमन कर, वृक्ष कर, स्वच्छता कर, घनकचरा प्रकल्प शुल्क, विशेष पाणी पट्टी कर, अशा रकमेचे बिले नागरीकांच्या हाती देत आहेत या विषयांची व झालेल्या कामांची एक नागरिक म्हणुन आपण सर्वांचे कर्तव्य असल्याची माहीती शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी दिली असुन या विषयाची संपुर्ण शहरात चर्चा होत आहे.
शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी यावल शहरवासीयांसाठी केलेले आवाहनाची शहरात सर्वत्र चर्चा रंगु लागली आहे. दरम्यान तत्कालीन यावल नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी यावर खुलासा करावा कुणाच्या कारकीर्दीत किती वृक्ष लागवड झाली . झाली असेल तर फक्त फोटोसेशन पुरती का? कुठे – कुठे आग लागली आणि लागलीही असेल तर आग विझवणारे सक्षम कर्मचारी आपल्याकडे आहेत का?, पाणीपट्टीची रक्कम नागरीकांकडून वसुल करण्याची मोहीम राबविण्यात येणार तर वर्षातुन नगर परिषद प्रशासनाने यावलकराना किती दिवस पाणीपुरवठा केला. याची दक्षता वसुलीला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किंवा माजी नगर परिषदेच्या सर्व प्रभागातील नगरसेवक व नगराध्यक्षांनी जनतेसमोर खुलेआम समोरासमोर बसून मांडावी विनाकारणचे एकमेंकावर आरोप करून शहरातील जनतेची दिशाभूल करू नका आणि स्वतःची व्हॉटसगृप द्वारे प्रसिद्धी करण्यासाठी जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन नका असे आवाहन शिवसेनेचे नितिन सोनार सर्व सामान्य नागरीकांना केले आहे .