Home Cities पाचोरा काँग्रेसच्या अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी शरीफ सादिक शेख

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी शरीफ सादिक शेख

0
33

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील शरिफ सादिक शेख यांची काॅंग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या पाचोरा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या दुर दृष्टीकोनातून समाजाच्या सर्व स्तरावरील विशेषतः तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत काँग्रेसचे विचार पोहचविणे, व तेच विचार घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे काम सुरू आहे. यात अधिक भर म्हणुन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत पाचोरा येथील शरिफ सादिक शेख यांची काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या पाचोरा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडी पत्र अब्दुल हमिद अब्दुल वाहेद शेख यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound