विधीसेवा प्राधिकरण व वकिल संघामार्फत मुक्तळ येथे कार्यक्रम

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतीनिधी | बोदवड तालूका विधीसेवा प्राधिकरण व बोदवड तालुका वकिल संघा मार्फत मुक्तळ ग्रा.प.कार्यालय जवळील प्रांगणात कार्यक्रम आयोजन करण्यात आले . यावेळी माहीती अधिकार कायदा व ज्येष्ठ नागरिक अधिकार व त्याचे कल्याणकरी योजना यावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोदवड तालूका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी माहिती अधिकार कायदा २००५ यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडताना त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा इतिहास, माहिती अधिकार कायदा करण्याची कारणे कोणती ? व माहिती अधिकार कायद्याची गरज यावर आपले विचार मांडताना त्यांनी सांगितले कि, एकविसाव्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जनतेला प्रशासकीय कारभाराची माहिती सहजगत्या मिळणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती मिळविणे हा लोकांचा मुलभूत अधिकार असून, समृद्ध लोकशाहीचा तो पाया आहे.

ते पुढे म्हणाले की, शासकीय कारभारात प्रशासन यंत्रणेत पारदर्शकता विश्वासार्हता आणि खुलेपणा असणे आवश्यक आहे. जनतेच्या मुलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि हा अधिकार त्यांना परिणामकारक रित्या वापरता यावा म्हणून महाराष्ट्र राज्याने, माहिती अधिकाराचा अध्यादेश व त्या खालील नियम, राज्यभर २३ सप्टेंबर २००२ पासून लागू केला होता. दिनांक १५ जून २००५ रोजी केंद्र शासानाने माहितीचा अधिकार कायदा २००५ लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने १२ ऑक्टोबर २००५ पासूल लागू केला आहे.

या कायद्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणणे व त्याचबरोबर काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होणेच्या दृष्टीने याची अमंलबजावणी सुरु आहे असे ते म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक अधिकार व कल्याणकारी योजना या बद्दल बोदवड तालुका वकील संघाचे सचिव ऍड. धनराज सी. प्रजापती यांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश क्यु. यु.एन शरवरी हे होते. यावेळी व्यासपीठावर अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, सचिव धनराज सी. प्रजापती, सौ.पल्लवी पाटील सरपंच ग्रा.प.मुक्ताळ ,उपसरपंच सौ.नंदा पाटील, किशोर महाजन हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन के. एस इंगळे यांनी केले.

या कार्यक्रमास विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील, पोलीस कर्मचारी वर्ग, नागरीक वर्ग मोठ्या संख्येने हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी माजी सरपंच जितु पाटील, राजेंद्र महाजन, पोलीस कर्मचारी वर्ग यांनी परीश्रम घेतले.

Protected Content