जिजाऊ उद्यानात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |१२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बोदवड येथील जिजाऊ उद्यानात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम जिजाऊ उद्यानात असणाऱ्या  उन, वारा व पाऊस यामुळे खराब झालेल्या मूर्तिच्या जागेवर माँसाहेब जिजाऊ यांची ६ फुट उंच व बालशिवबा यांची ४. ६ फुट अशा उंच मूर्तिची स्थापना करण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनीताई पाटील व सर्व जिजाऊ ब्रिगेड व गावातील व परिसरातील महिलांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात आले.

त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील, बोदवड नगरीचे प्रथम नागरीक व नगराध्यक्ष आनंदा पाटील मराठा सेवा संघ जळगावचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, तालुका अध्यक्ष विलास सटाले, राजमाता जिजाऊ बालोद्यान बोदवडचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री संजय  पाटील, नगरसेवक, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठीत नागरीकांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात आले, नंतर तायडेसर यांनी जिजाऊ वंदना म्हटली व नंतर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. प्रस्ताविक शिवश्री अनिल पाटील यांनी केले. आमदार चंद्रकांतपाटील यांनी जिजाऊ उद्यानासाठी  सर्वोतोपरी मदत करेल व ते माझे कर्तव्य समजतो असे आपले दोन शब्द मनोगत व्यक्त केले. यामिनीताई पाटील यांचा जिजाऊ उद्यान समिती कडून सत्कार करण्यात आला. ‌तायडे मावशी व शाळेतील मुलींनी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व शाळकरी मुलांचा स्मृतिचिन्ह व माँ जिजाऊ यांचे चारित्र ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन शिवश्री अतुल पाटील यांनी केले. सुत्र संचालन शिवश्री शरद पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील, अनिल देवकर, संजय पाटील, निलेश महाजन, विलास सटाले, योगेश पाटील, अतुल पाटील, विशाल तांगडे यांनी चार दिवस अथक परिश्रम करून सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी न. ह. रांका हायस्कूलचे – ऋतुजा सटाले, श्रेया अहिर, लीना शेळके, चि.स.म. जामठी हायस्कूलचे – दिपाली चौधरी, अनुराधा पोते २) शेलवड हायस्कूलचे – वैष्णवी सोन्नी, धनश्री मेतकर, वैष्णवी राऊत, के.जी. पाटील हायस्कूल नाडगावचे – कृष्णा म्हस्के , प्रसाद कोरडे या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला.

Protected Content