धक्कादायक : हातातून मोबाइल हिसकावल्याने रागाच्या भरात चिमुकलीने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । मुलीच्या हातून आईने मोबाईल घेत तिला अभ्यास करण्याचे सांगितले आणि याचा राग मनात ठेवत १२ वर्षाच्या चिमुकलीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी १३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत घडली. याप्रकरणी रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,
आयोध्या नगर परिसरातील एका शाळेत शिक्षक असलेले भरत पाटील हे रामानंद नगरातील नंदनवन कॉलनीत वास्तव्यास आहे. त्यांची १२ वर्षाची मुलगी पद्मश्री उर्फ परी ही मोबाईल खेळत असल्याने तिच्या आईने तिला रागवले आणि तिच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला. रागाच्या भरात पद्मश्री ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेली व झोक्याच्या कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी परी खाली न आल्याने कुटुंबीय खोलीकडे गेले. दरवाजा ठोठावूनदेखील मुलगी प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्या वेळी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. ही घटना शनिवारी १३ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता उघडकीला आले. कुटुंबियांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषीत केले. यावेळी पाटील कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विठ्ठल पाटील व ज्ञानेश्र्वर पाटील हे घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पद्मश्री उर्फ परी ही ओरीऑन इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. ती अभ्यासातदेखील हुशार होती. तिच्या या टोकाच्या पावलामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content