Home क्राईम किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ व दमदाटी

किरकोळ कारणावरून महिलेला शिवीगाळ व दमदाटी


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |पत्ते खेळण्यासाठी गेलेल्या पतीला बोलविण्यासाठी गेलेल्या महिलेला एकाने शिवीगाळ केल्याची घटना पंचशिल नगरात घडली आहे. याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील पंचशिल नगरात मुमताज शौकत पिंजारी वय ४५ या महिला आपल्या पती व कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता तिचे पती पत्ते खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुमताज पिंजारी यांनी पती शौकत पिंजारी यांना बोलावण्यासाठी गेल्या. याचा राग आल्याने त्याठिकाणी पत्ते खेळणारा बाळा सोनवणे रा. पंचशिल नगर, भुसावळ याने शिवीगाळ करून दमदाटी केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून बाळा सोनवणे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नेव्हील जॉर्ज बार्टले हे करीत आहे.


Protected Content

Play sound