शिरसाळ्यात हटकर पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेचा महारोजगार मेळावा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाळा मारोती देवस्थानावर रविवारी अखिल हटकर पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या महारोजगार मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्यास २४ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. खान्देश,विदर्भ,आणि मराठवाड्यातील एकूण ५०७ युवक युवतींनी मुलाखत दिल्या त्यापैकी २०९ पात्रताधारक युवक युवतींना नियुक्ती पत्रक देण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल हटकर पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील हे होते.

सर्व मान्यवर व सर्व कंपनी प्रतिनिधी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सर्व कंपनी प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचे केलेले नियोजन बघून कौतुक केले.ज्या मुलामुलींना नियुक्ती पत्र देण्यात आले त्यांनी त्यांच्या मनोगतातून समिती चे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.सदरील मेळाव्याचे आयोजन समितीचे संचालक किरण पाटील यांच्या पुढाकाराने शक्य झाले.

संस्थ्येचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वतीने भविष्यात सुद्धा संस्थेच्या वतीने आशा प्रकारच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असा मनोदय व्यक्त केला.मेळाव्याचे सूत्रसंचालन गजानन गव्हारे यांनी केले प्रास्ताविक श्रीकृष्ण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदन पाटील यांनी केले. भरत पाटील व पुंजाजी पाटील सरपंच कोल्हाडी यांनी स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली होती त्याबद्दल समिती तर्फे त्यांचे व ज्या समाज बांधवांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेळाव्याच्या आयोजनात सहभाग नोंदविला त्या सर्वांचे आभार व्यक्त करून महारोजगार मेळाव्याचा शेवट करण्यात आला.

Protected Content