बोदवड न्यायालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात,  बोदवड तालुका वकील संघ यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संत गाडगे महाराज हे आधुनिक संत असल्याचे प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अर्जुन पाटील यांनी केले. यावेळी त्यानी संत गाडगे महाराज यांचे बद्दल काही महत्वपुर्ण तथ्य सागितले. गाडगे महाराजांचे खरे नाव डेबुजी झिंग्राजी जानोरकर असे होते. प्रवास करताना गाडगे महाराजांना झाडू घेऊन फिरताना दिसायचे. त्यांना स्वच्छता इतकी प्रिय होती की, गावात प्रवेश करताच ते संपूर्ण गाव स्वच्छ करण्यास सुरवात करत असे. गाडगे महाराज लोकांकडून मिळालेला पैसा ते अनेकदा शैक्षणिक संस्था, रुग्णालये, प्राण्यांचे आश्रयस्थान इत्यादी बांधण्यासाठी दान करत.

गाडगे महाराज हे विद्वान होते. लोकांना अंधश्रद्धा आणि सनातनी कर्मकांडाच्या विरोधात शिकवण्यासाठी ते गावोगावी कीर्तन करत असत. संत गाडगे बाबा आपले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी करुणा, सहानुभूती आणि मानवता शिकवण्यासाठी दोहे च्या माध्यमातुन संदेश देत. संत गाडगे महाराजांनी लोकांना शिकवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे धार्मिक कारणांसाठी प्राण्याचा बळी देण्याची जुनी प्रथा बंद करणे आणि दारूच्या वापराविरुद्धही व्यापक प्रचार केला. संत गाडगे महाराजांनी लोकांच्या प्रबोधनाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांचे कुटुंब (एक पत्नी आणि 3 मुले) सोडले हे फार कमी लोकांना माहीत आहे. संत गाडगे बाबांवर डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा प्रभाव होता. बी.आर.आंबेडकर यांची कार्यशैली, त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्यानंतर ते ज्या प्रकारे ते राजकारणी म्हणून उदयास येत होते ते पाहून ते प्रभावित झाले. संत गाडगे महाराज यांना स्वच्छता आणि स्वच्छतेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल स्मरण केले जाते.

सदर प्रसंगी कार्यक्रमात संत गाडगे महाराज व अधंश्रध्दा निमुर्लन या विषयावर अॅड. धनराज प्रजापती यांनी विचार मांडले. तर ॲड.पी.आर.मोझे, अॅड. के.एस. इंगळे, ॲड. रमाकांत महाजन, ॲड.किशोर महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.पी.आर.मोझे हे होते. यावेळी सदर कार्यक्रमास अॅड.सी. के. पाटील, ॲड. रविंद्र जनवाणी नांदुरा, तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी, वकील पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर पक्षकार व उपस्थितानसाठी संत गाडगे महाराज यांचा प्रसाद म्हणुन जेवण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता.

Protected Content