राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हासंघ जाहीर

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने नागपूर टेनिस बॉल क्रिकेट संघटना आयोजित, नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुल येथे होत असलेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर झाला असून स्पर्धेत राज्यातील ३४ जिल्ह्यातील संघाचा समावेश आहे. स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड होणार असून, राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा अहमदाबाद (गुजरात) येथे होणार आहे. संघाला टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे राज्यसचिव डॉ. बाबर, टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे गोरखपूर (यु.पी.)येथून आलेले निरीक्षण वसीउल्ला खान, आनंद मकवाना, विशाल पवार जिल्हा सचिव वासेफ पटेल,निखिल राऊत, त्रिभुवन सिंग, नितीन जाधव यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.

जळगाव जिल्हा संघ असा आहे – तन्मय गव्हाळे (कर्णधार) रिजवान शेख (उप-कर्णधार) , समर्थ मालवेकर, तनिष्क पाटील, नबील कुरेशी, ज्योतिरादित्य पाटील, अनय पाठक, सार्थक पाटील, रणवीर यादव, संग्राम मोरे, दीप पवार, साहिल पाटील, तेजस बनभेरू, विनेश पाटील मो.शाहिद (प्रशिक्षक ), झहीर खान (व्यवस्थापक)

Protected Content