घरकुलसह इतर प्रलंबित कामे पुर्ण करा – बीडीओ दिपाली कोतवाल

रावेर प्रतिनिधी । घरकुल प्रकरणासह विविध योजनांचे प्रलंबित कामे लवकर पुर्ण करण्याच्या सुचना गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी ग्रामसेवकांना दिल्या.

विविध कामांसंदर्भात गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रलंबीत घरकुले तात्काळ पूर्ण करा, बेघर लाभार्थी जागा उपलब्ध करून द्या, तालुक्यातील ‘ड’च्या यादयांचे जॉबकार्ड मॅपींग लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.

आढावा सभा घेण्याचे कामे जिल्हा परिषद गट निहाय सुरु असुन या बैठिकाला ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बीडीओ यांनी बैठकीत ‘ड’ यादी आधारकार्ड मॅपीग, जॉबकार्ड मॅपींग , ग्रामीण भागात अपूर्ण घरकुल पूर्ण करणे व शक्ती प्रदत्त समिती प्रलंबीत प्रस्ताव कामे करणे, बेघर लाभार्थी जागा उपलब्ध करणे, प्रिया सॉप्ट प्रणाली नोंदी क्लोसींगसह इतर कामांचा आढावा घेवून प्रलंबित काम तत्काळ पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे, सधांशु आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.