बीसीसीआयने पंतप्रधानाना गिफ्ट म्हणून दिली टीम इंडियाची जर्सी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय संघाने बारबाडोसमध्ये जाऊन भारताचा झेंडा रोवला आहे. टीम इंडियाने १७ वर्षानंतर टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरून मायदेशी परतली. टीम इंडियाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना भारतीय संघाने दिल्लीत उतरल्या उतरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यंची भेट घेतली.

यावेळी संपूर्ण संघासोबत जवळपास दीड तास चर्चा रंगली. या मुलाखतीचा व्हिडीओ समोर आला असून ट्रेंड होत आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाची जर्सी गिफ्ट देण्यात आली. त्यावर शॉर्टफॉर्म म्हणून नमो लिहिलं आहे. तसेच जर्सीचा क्रमांक 1 दिला आहे.

Protected Content