नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. ही स्पर्धा 26 जुलैपासून सुरु होणार असून ११ऑगस्टपर्यंत होणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू सज्ज झाले आहेत. 2022 टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघांचं सुवर्ण पदक विजयाचं स्वप्न भंगले होते.भारतीय संघाला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. आता यावेळीच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 16 सदस्यीय संघात पाच नव्या खेळाडूंचा समावेश आहे. जर्मनप्रीत सिंग, संजय, राज कुमार पॉल, अभिषेक, सुखजीत सिंग हे नवखे खेळाडू असून पहिल्यांदाच हॉकी खेळणार आहेत. या संघाचं नेतृत्व पुन्हा एका हरमनप्रीत सिंग याच्याकडे असणार आहे.
भारतीय संघ ब गटात असून यात बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, आयर्लंड हे संघ आहेत. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला या गटात अव्वल चारमध्ये स्थान मिळवावे लागणार आहे. याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. 27 जुलै भारत विरुद्ध न्यूझीलंड, 29 जुलै भारत विरुद्ध अर्जेंटिना, 30 जुलै भारत विरुद्ध आयर्लंड, 1 ऑगस्ट भारत विरुद्ध बेल्जियम, 2 ऑगस्ट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे सामने असतील. 4 ऑगस्टला उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील.
भारतीय हॉकी संघ : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, संजय, राज कुमार पॉल, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद , अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग.
राखीव खेळाडू: गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीलकंठ शर्मा आणि बचावपटू जुगराज सिंग.