राजकीय

अमळनेर राजकीय

शिवसेना-भाजपचे ‘वाघ’ अमळनेरात एकाच व्यासपीठावर (व्हीडीओ)

अमळनेर (प्रतिनिधी)  जंगलात जसे वाघ दिसणे मुश्कील असते तसे राजकारणातही दोन वाघ एका व्यासपीठावर येणे हा मोठा दुर्मिळ योग होता. हा योग गुरुवारी येथे जुळून आला. निमित्त होते शहरातील मा. बाळासाहेब ठाकरे चौक अनावरण सोहळ्याचे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ एकाच व्यासपीठावर आले होते. या दोघांची एका व्यासपीठावर उपस्थिती अनेकांना उत्साह देणारी तर अनेकांना धडकी भरवणारी होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र योग्यवेळी समझोता होऊन युती कायम राहिल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याप्रसंगी उदय वाघ म्हणाले की, शहरातील प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत प्रताप शिंपी यांनी […]

भुसावळ राजकीय

सर्वांच्या सहकार्याने विकास केला- रक्षाताई खडसे

भुसावळ प्रतिनिधी । सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या कार्यकाळात विविध विकासकामे करून विविधांगी योजनांना गती मिळाल्याचे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. त्या येथील डॉ. आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, मी खासदार बनल्यानंतर बाबांनी मला समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा मंत्र दिला होता. आपण लोकांमध्ये गेले पाहिजे. त्यांची कामे केली पाहिजे ही शिकवण त्यांनी मला दिली. आजवर हीच शिकवण मी अंमलात आणली आहे. पहिल्यांदा एक महिला […]

धरणगाव राजकीय

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी: देवेंद्र फडणवीस

धरणगाव (प्रतिनिधी)  येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीकेंद्रासाठी तयार करण्यात आलेल्या 15 कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येत असून या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतिकारी आणि प्रेरणादायी विचार समाजापर्यंत पोहोचविले जावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, हेलीपॅडवर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. धरणगाव येथे क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्थेतर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक सह कार्यवाहक भैयाजी जोशी, श्री. नायराणस्वामी, संस्थेचे अध्यक्ष श्री. भाईदास सोनवणे आदी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले, क्रांतीकारी खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा […]

राजकीय राष्ट्रीय

राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा मोदी-अंबानींवर निशाणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले, त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल अंबानी सारख्या माणसांनी समाजासाठी कधीच काही दिले नाही फक्त घेतले आहे. अशा लोकांना मात्र 30 हजार कोटी रुपये ‘गिफ्ट’ दिले जाते, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केले आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात 453 […]

कोर्ट राजकीय

राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्ट तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुप्रीम कोर्टाने १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निकालात राफेल करारात सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या नाही, असे सांगत या कराराच्या चौकशीची मागणी फेटाळली होती. परंतु मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या या निकालासंदर्भात दाखल झालेल्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे.   फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. त्यावर सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. एस के कौल, न्या. के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने 14 डिसेंबर 2018 रोजी या याचिकांवर निर्णय देत मोदी सरकारला क्लीन चीट दिली होती. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात प्रशांत भूषण […]

धरणगाव राजकीय सामाजिक

आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारचे मोठे काम- मुख्यमंत्री

धरणगाव (प्रतिनिधी) इंग्रजांशी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणारे खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांचा व्यापार उद्वस्त करण्याची कामगिरी केली होती. त्यांचे धरणगावात स्मारक व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती. त्यानुसार आज या स्मारकाची पायाभरणी होत आहे. गेल्या ५० वर्षात सरकारने जेवढे आदिवासी बांधवांसाठी केले नसेल तेवढे या सरकारने गेल्या साडेचार वर्षात केले आहे. केवळ आश्वासने न देता त्यांच्यासाठी विविध योजना राबवून प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आज ते येथील खाज्याजी नाईक स्मृति संस्थेतर्फे आयोजित भव्य जनजागृती मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, […]

भुसावळ राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल

भुसावळ प्रतिनिधी । धरणगाव येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत धरणगाव येथे जनजाती मेळावा नुकताच संपन्न झाला. यानंतर मुख्यमंत्री भुसावळ येथे आले असून येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. भुसावळ येथील हेलीपॅडवर माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

धरणगाव राजकीय सामाजिक

धरणगावच्या जनजाती मेळाव्यास प्रारंभ

धरणगाव (प्रतिनिधी) येथिल जनजाती मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचलेले आहेत. यावेळी संघाचे भय्याजी जोशी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. एरंडोल रोडवर तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी जळगावच्या विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. धरणगाव येथिल जनजाती मेळाव्यास संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या स्थळी प्रचंड गर्दी आहे. यावेळी व्यासपिठावर संघाचे बाळासाहेब चौधरीयांच्यासह मोजकीच मंडळी होती. उपस्थित मान्यवरांसह […]

जळगाव राजकीय

मुख्यमंत्री जळगावहून धरणगावला रवाना

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव व भुसावळ येथील विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर सकाळी ११:१५ वाजेला आगमन झाले. दरम्यान,थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने धरणगावला रवाना झाले आहेत.   मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. धरणगाव येथिल जनजाती मेळाव्यास संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमला मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख अतिथी आहेत. यावेळी क्रांतिकारी खाजा नाईक यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

भुसावळ राजकीय

मुख्यमंत्री आज नेमका कोणता ‘डोस’ देणार ?

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी पक्षातील दोन्ही गट झटून कामाला लागले आहेत. मात्र या गटांना एकत्रीत राहण्यासाठी ते नेमका काय ‘डोस’ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जळगाव जिल्हा भाजपमधील गटबाजी आता अगदी उघड धुम्मसच्या स्वरूपात उफाळून आली आहे. जळगावात आमदार राजूमामा भोळे यांच्याविरूध्द पक्षातील दुसर्‍या गटाने दंड थोपटले आहे तर दुसरीकडे भुसावळात १६ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवरूनही दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. यातच एका गटातील मातब्बर नेत्याची कथित वस्त्रहरण करणारी क्लिप व्हायरल करण्यामागे दुसर्‍या गटाचा हात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. म्हणजे आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर त्या नेत्यासोबत पक्षाच्या अब्रूची लक्तरेदेखील वेशीवर […]