राजकीय

जळगाव धरणगाव राजकीय

मुख्यमंत्र्यांनी वाहनात बसवुन केली राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा !

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणगाव येथे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. स्वागत झाल्यावर नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी “माझ्यासोबत वाहनात या ” असे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये जळगाव जिल्हा व मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चाही झाली. ना .गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पालकमंत्री शेत पाणंद रस्त्या साठी शेतकऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या वाढत्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी शेतरस्त्यांसाठी कमीत कमी 60 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करणे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे स्मारक व परिसर विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करणे. नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासना कडे […]

जळगाव भुसावळ राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात भाजपमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणगाव व जळगाव येथील दौर्‍यात गुळमुळीत पवित्रा घेत काही लोकप्रिय घोेषणा निश्‍चितच केल्या. मात्र पक्षातील गटबाजीला थांबविण्यात तेदेखील अपयशी ठरले. या अंतर्गत कलहाचा पक्षाच्या आगामी वाटचालीवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धरणगाव व भुसावळ येथे सभा घेतल्या. यात धरणगाव येथे त्यांनी जनजाती संमेलनास संबोधित करून क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या स्मृती आराखड्यासाठी निधीची घोषणा केली. तर भुसावळातील सभेत बेघरांना घरे देण्याची घोषणा करत खासदार रक्षा खडसे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र या दोन्ही सभांमधील विसंगती लक्षात घेण्याची गरज आहे. खरं तर शेतकर्‍यांच्या लाँच मार्चमुळे ना. गिरीश महाजन हे दोन्ही कार्यक्रमांना […]

जळगाव राजकीय

गाळेधारकांना दिलासा;महासभेत ना.महाजन व आ.भोळेंच्या नावाचा जयघोष

जळगाव (प्रतिनिधी) येथील मनपाच्या मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत भाड्याच्या रकमेपोटी पाचपट दंड वसूल करण्याचा निर्णय तत्कालिन महासभेने घेतला होता. अखेर सत्ताधारी भाजपाने भाजपाने पाचपट दंडाचा निर्णय रद्द करून थकी भाड्यावर २ टक्के शास्ती लावण्याचा निर्णय विरोधकांच्या विरोधाला न जुमानता मंजूर केला. यानंतर भाजप नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्या नावाने विजयी घोषणा दिल्यात. दरम्यान,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आजची महासभा नियोजित वेळेपेक्षा अर्धातास उशिराने सुरु झाली. महापौर सिमा सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या दुसर्‍या मजल्यावर महासभा घेण्यात आली. यावेळी व्यासपिठावर उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव गोराणे आदी उपस्थित होते. महासभेत नगरसेविका भारती कैलास सोनवणे यांनी […]

यावल राजकीय

काँग्रेसच्या चलो पंचायत अभियानास प्रारंभ

फैजपूर प्रतिनिधी । रावेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे चलो पंचायत या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. येथील आठवडे बाजारात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी, तर जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव डॉ.शोएब पटेल, जळगाव शहराध्यक्ष मुक्तदीर देशमुख, अलीम शेख, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, फैजपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद कौसर, शेख वसीम जनाब, मुदस्सर नजर शेख, प्रा.वहीदुजमा, शेख रियाज, शेखर तायडे, जिल्हा सरचिटणीस रामराव मोरे, नरेंद्र नारखेडे, बबन तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता असून महागाईने जनता त्रस्त, […]

भुसावळ राजकीय

आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

भुसावळ प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात विविध विकासकामांचे रिमोटद्वारे भूमिपुजन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे, माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार सावकारे यांचे हे कार्यालय जामनेर रोडवर आहे.

जळगाव राजकीय

काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर

जळगाव (प्रतिनिधी) शहर जिल्हाअध्यक्ष डाँ.राधेश्याम चौधरी यांच्या शिफारसीने ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दिपक बाविस्कर यांची नियुक्ती केली आहे. दिपक बाविस्कर यांनी सामाजिक राजकीय विविध पदे भूषविले आहे. ते महाराष्ट्र परीट धोबी महासंघ या संघटनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आहेत. तसेच संत श्री गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था जळगाव या सामाजिक संस्थेचे प्रसिध्दी प्रमुख असून मागील पंधरा वर्षां पासून पत्रकारिता करत आहेत. जळगाव शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढविली आहे. दुसरीकडे चेतन कासलीवाल (MBA finance) यांची जळगाव शहर जिल्हा काँग्रेसच्या सोशल मिडीया सेलच्या समन्वयकपदी तर रियाज शेख (B. E.) यांची सहसमन्वयकपदी नियूक्ति कॉंग्रेस सोशल मिडीया […]

राजकीय राष्ट्रीय

महाआघाडीचे जागावाटप ठरले; बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार

लखनौ (वृतसेवा) समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सपा आणि बसपामधील जागावाटप जाहीर झाले असून बसपा 38 तर सपा 37 जागांवर लढणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सपा,बसपाने उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी करण्याचा निर्णय होता. परंतु महाआघाडीची घोषणा होऊन महिना उलटला तरी दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची घोषणा झाली नव्हती. परंतु अखेर सपा आणि बसपामध्ये ठरलेल्या जागावाटपाच्या सूत्रानुसार दोन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशमधील 80 जागांपैकी काही जागा मित्रपक्षांना सोडून उर्वरित जागांचे आपसात वाटप केले आहे. त्यानुसार सपा 37 तर बसपा 38 जागांवर […]

भुसावळ राजकीय

खासदार रक्षाताई यांचे काम पथदर्शी- मुख्यमंत्री (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे या फक्त तरूणच नव्हे तर कार्यक्षम खासदार असून त्यांचे काम हे अन्य लोकप्रतिनिधींसाठी पथदर्शी ठरणार असल्याचे कौतुकोदगार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील मुख्य कार्यक्रम हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यात खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यवृत्ताच्या प्रकाशनासह विविध योजनांच्या भूमिपुजनाचा समावेश होता. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून रक्षाताई खडसे यांच्या कार्याचा गौरव केला. रक्षाताईंनी आपल्या कार्यकाळात विविध योजनांचा गती दिल्याबद्दल त्यांनी कौतुकोदगार काढले. […]

अमळनेर राजकीय

कपिलेश्वर देवस्थानसाठी दोन कोटी मंजूर – आ. चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास इमारतीसाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली आहे. या उल्लेखनीय विकास कामाबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व राज्याचे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. या कामामुळे भक्तांना मंदिरस्थळी निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. तापी, पांझरा व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर निसर्गरम्य वातावरणात कपिलेश्वर देवस्थान असून याठिकाणी हे भव्य व पुरातन हेमाडपंथी शिव मंदिर आहे, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी शेकडो वर्षांपूर्वी याची निर्मिती केली असून हे देवस्थान जळगाव ,धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सुपरिचित आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला […]

राजकीय राष्ट्रीय

कॉंग्रेस आम्हाला भाव देत नाही – केजरीवाल

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) ‘युतीसाठी मी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो. पण ते प्रतिसादच देत नाही,’ अशी खंत दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. पुरानी दिल्लीतील जामा मशीद परिसरात एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्तीत भाजपला चीत करण्यासाठी काँग्रेस व आपनं एकत्र यावं यासाठी केजरीवाल बऱ्याच दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडं पूर्णपणे कानाडोळा केला आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची मतं १० टक्क्यांनी कमी होतील. काँग्रेस आणि आप दिल्लीतील सात लोकसभेच्या जागांवर एकत्र लढल्यास मतांचे विभाजन होणार नाही. इतकंच नव्हे तर भाजपला दिल्लीत एकही जागा जिंकता येणार नाही, असं केजरीवालांना […]