Home Cities जळगाव नेहरू चौकात भीम गीतांच्या स्वरांवर रसिकांनी धरला ठेका : मान्यवरांची मांदियाळी !

नेहरू चौकात भीम गीतांच्या स्वरांवर रसिकांनी धरला ठेका : मान्यवरांची मांदियाळी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान’च्या वतीने शहरातील नेहरू चौक परिसरात ‘भीम गीतांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सादर झालेल्या स्फूर्तीदायक भीम गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

भीम गीतांचा स्फूर्ती सोहळा :
कार्यक्रमात मुख्य गायक शरद भालेराव, संजय सूर्यवंशी, वर्षा चौधरी, प्रकाश लोढवे, प्रबुद्ध भालेराव, चंद्रकांत मयलागीर आणि किशोर शिरसाठ यांनी एकापेक्षा एक सरस भीम गीते सादर केली. बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणारी आणि समतेचा संदेश देणारी ही गीते ऐकताना रसिक भारावून गेले होते. अनेक लोकप्रिय गीतांवर उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे दाद देत ठेका धरला, ज्यामुळे संपूर्ण नेहरू चौक परिसर भीममय झाला होता.

मान्यवरांची मांदियाळी :
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली. व्यासपीठावर जळगाव जनता सहकारी बँकेचे चेअरमन सतीश मदाने, महापौर दीपमाला काळे, प्रांत अधिकारी विनय गोसावी, वंचित बहुजन आघाडीचे नेते हरिश्चंद्र सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपक्रमाचे कौतुक केले.

उत्स्फूर्त प्रतिसाद :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा संगीताच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरला. आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या स्वर सोहळ्याने जयंतीच्या उत्साहात भर घातली.


Protected Content

Play sound