Home Cities जळगाव झुंबा फिटनेस व डान्स शिबिराचा जल्लोषात समारोप  

झुंबा फिटनेस व डान्स शिबिराचा जल्लोषात समारोप  


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या झुंबा फिटनेस व डान्स प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप पार पडला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था आणि ड्रॅगन्स डान्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सात दिवसीय शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, तब्बल 200 महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या शिबिराचे उद्घाटन महापौर सौ. दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले होते. समारोप सोहळ्यास माजी महापौर जयश्री महाजन, मा. सिंधुताई कोल्हे, सौ. श्रद्धा नखाते, सौ. डॉ. नीलिमा सेठीया, सौ. अभिलाषा चराटे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकातून मनिषा पाटील यांनी केली, तर सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी प्रभावीपणे पार पाडले. यावेळी मंचावर नारीशक्ती संस्थेच्या मनिषा पाटील, ड्रॅगन्स डान्स अँड फिटनेसच्या डॉली आनंदकुमार तसेच मुख्य प्रशिक्षक बी. आनंदकुमार उपस्थित होते.

संपूर्ण शिबिरादरम्यान महिलांना बॉलीवूड डान्स, झुंबा फिटनेस, फिटनेस एरोबिक्स, योग्य आहार, वजन कमी करणे (वेट लॉस) आणि इंचेस लॉस याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक डॉली आनंदकुमार आणि बी. आनंदकुमार यांनी विविध तंत्रांचा वापर करून महिलांना फिटनेसकडे आकर्षित केले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र दिसून आले.

शिबिराच्या समारोपावेळी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तेजल वनरा, रंजिता सोनार, नीता पाटील, भावना पाटील, रेणुका हिंगु, आशा मौर्य, नेहा मौर्य, राधिका पाटील, पोर्णिमा धांडे, दिशा ठाकूर, श्रावणी पाटील, मोनिका तळेले आणि जयश्री पाटील यांनी विशेष कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला हर्षा गुजराती, स्मिता पाटील तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आनंददायी वातावरणात झाली.


Protected Content

Play sound