जळगाव

जळगाव

मान्सुई रुग्णालयातील आग आटोक्यात

जळगाव (प्रतिनिधी) येथील विसंजी नगरमधील मान्सुई रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. डॉक्टर राजीव देशमुख यांचे मान्सुई रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर आज दुपारी लाकडी झोपडीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागल्यामुळे रुग्णालयात पळापळ झाली. परंतु अग्निशामक दलाने तात्काळ दाखल होत पुढील अनर्थ टाळला. थोड्याच आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक शामक दलाला यश आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. येथील विसंजीनगरमध्ये मान्सुई हॉस्पिटल आहे.तेथे आज नेहमीप्रमाणे रुग्णाची तपासणी सुरु होती. दुपारी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर डॉ राजीव देशमुख यांनी असलेल्या लाकडी रूम बनविली आहे. दुपारी साधारण 1.45 ते 2 वाजेच्या सुमारास तेथे अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या […]

जळगाव सामाजिक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णा हजारे प्रणीत संघटनेची निदर्शने

जळगाव प्रतिनिधी) जनलोकपाल नियूक्ती, शेतकरी संरक्षण कायदा अंमलात आणावा, या करीता अण्णा हजारेप्रणित संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्त्यांनी सहभागी होत निदर्शने व धरणेआदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गोवाळीकर यांना निवेदन देखील देण्यात आले.   या संदर्भात अधिक असे की, लोकआयूक्त नियूक्ती तसेच शेतकरी संरक्षण कायदा अंमलात आणावा, या करीता अण्णाहजारे प्रणित संघटनेने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणाला जळगाव जिल्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठींबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणेआंदोलन केले. यावेळी उल्हास साबळे, विजय पाटील, लतीफ गयास शेख,सुरेश पाटील, गोरख पाटील, सुरेश मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व […]

चोपडा जळगाव राजकीय

देशातील कोणत्याही गरीब व्यक्तीला मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची गरज नाही : अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील

जळगाव (प्रतिनिधी) छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कर्जमाफीबाबत राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तीनही राज्यात सरकार आल्याच्या अवघ्या 48 तासांच्याआत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष जळगाव जिल्हा डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील, माजी महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, राजस कोतवाल आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशात गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना राबविण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली असून या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर देशातील एकाही गरीब व्यक्तीला आपल्या मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची […]

जळगाव

जळगावातील मान्साई हॉस्पीटलला आग

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगर येथे असणार्‍या मान्साई हॉस्पीटलला आज दुपारी आग लागल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. विसनजी नगरामध्ये बालगंधर्व नाट्यगृहाजवळ डॉ. राजीव नारखेडे यांचे मान्साई हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसून शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. (सविस्तर वृत्त लवकरच)

Uncategorized क्राईम जळगाव

जळगावात पोलिसांचे पथसंचलन

जळगाव प्रतिनिधी । आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर आज सकाळी पोलीस प्रशासनाने शहरातून पथसंचलन (रूट मार्च ) केले. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महसूल प्रशासनाने आधीच मतदान यंत्राबाबत आधीच जनजागृती करण्यास प्रारंभ केला आहे. तर आता पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच्या अंतर्गत आज शहरातून पथसंचलन करण्यात आले. शहरातील शाहू नगर व शिवाजी नगरसह गेंदालाल मील परिसरात हे पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांसह गोपनीय शाखेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

जळगाव धरणगाव राजकीय

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात कुणाचे आव्हान कुणाला?

  धरणगाव : कल्पेश महाजन जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास शिवसेनाच प्रथम क्रमांकावर आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गतनिवडणुकीप्रमाणे महायुती न झाल्यास शिवसेनेला पुन्हा फायदाच आहे. मात्र, युती झाल्यास त्याचा फटका शिवसेनेचे विद्यमान आमदार ना.गुलाबराव पाटील यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपसोबत युती करून लढणे शिवसेनेला कधीही आवडत नाही. कारण याचा फायदा नेहमीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला झाल्याचा इतिहास आहे. २०१४ च्या तुलनेत या मतदारसंघात शिवसेना व भाजपने जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेत देखील प्राबल्य वाढवले आहे. तर दुसरीकडे मात्र,राष्ट्रवादी गलितगात्र झाल्याचे चित्र आहे. एकंदरीत आगामी विधानसभेच्या दृष्टीने मते खेचण्यासाठी […]

जळगाव राजकीय

संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी- मलीक

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील जनता आणि संपूर्ण समाज अनिल भाईदास पाटील यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहून त्यांना विजयी करणार असल्याचे प्रतिपादन हाजी गफ्फार मलिक यांनी येथे केले. तालुक्यातील नशिराबाद येथील ऊकाब एज्युकेशन अण्ड मल्टिपपर्ज सोसायटीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर होते. तर प्रमुख उपस्थिती हाजी गफ्फार मलिक यांची होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठीचे संभाव्य उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनीही उपस्थिती दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव लोकसभेचे भावी खासदार म्हणून त्यांची ओळख करून देत सर्व समाज आणि सर्व नशिराबाद त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहणार असल्याचही ग्वाही गफ्फार मलीक यांनी […]

जळगाव सामाजिक

जळगावात ‘महात्मा को नमन’ प्रदशर्नास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधींजीच्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा को नमन’ चित्रप्रदर्शनाचे आज संध्याकाळी उदघाटन करण्यात आले. यांची होती उपस्थिती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, संघपती दलीचंदजी जैन, गांधी विचारांचे अभ्यासक प्रो. मार्क लिंडले, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विश्‍वस्त ज्योती जैन, अंबिका जैन उपस्थित होते. हे प्रदर्शन ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान महात्मा गांधी उद्यानात सर्वांसाठी खुले असणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन या प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या निर्वाणानंतरच्या बाबी- अंतिमयात्रा, अंतिमसंस्कार, अस्थिकलश यात्रा, अस्थिविसर्जन व त्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींसोबतच महनीय व्यक्तिंनी वाहिलेली श्रद्धांजली इत्यादिचा समावेश यात असणार आहे. वैश्‍विक पातळीच्या अनेक बाबी बघण्याची अनमोल संधी या निमित्ताने जळगावकरांसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनने […]

क्राईम जळगाव

मुलाच्या विवाहाची पत्रीका वाटप करण्यासाठी जाणार्‍याचा अपघाती मृत्यू

जळगाव पतिनिधी । मुलाच्या विवाहाची पत्रीका वाटप करण्यासाठी जाणार्‍या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज शहराजवळ घडली. याबाबत माहिती अशी की, खडके बुद्रुक ता. एरंडोल येथील श्रीराम उत्तम पाटील हे त्याच्या मुलाच्या लग्न पत्रिका वाटप जाळण्यासाठी खेडी येथे जात होते. कालिंका माता चौफुलीच्या पुढे असणार्‍या हॉटेल गौरव जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. १० फेब्रुवारी रोजी त्याच्या मुलाचे लग्न होते त्यासाठी ते पत्रिका वाटप करण्यासाठी जात होते. त्यांना दोन मुले असून यातील इंजिनिअर मुलगा हा पुण्याला असून याचा विवाह उखलवाडी तालुका धरणगाव येथे होणार आहे. मात्र मुलाचा विवाह पाहण्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

आरोग्य जळगाव

रोटरी इस्टतर्फे मोफत प्लास्टीक व कॉस्मेटीक सर्जरी शिबिर

जळगाव प्रतिनिधी । येथील रोटरी इस्टतर्फे २ व ३ फेब्रुवारी रोजी मोफत प्लास्टीक व कॉस्मेटिक सर्जरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. रोटरी इस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य लाभले असून खापरखेडा येथील गंगाराम केशव पाटील यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लकी टेलर यांनी याला विशेष सहकार्य केले आहे. या पत्रकार परिषदेला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे आणि रोटरी ईस्टचे रजनीश लाहोटी हे उपस्थित होते. याशिबिरामध्ये विख्यात सर्जन डॉ. पंकज जिंदल आणि डॉ. शंकर सुब्रमण्यम हे शस्त्रक्रिया करणार आहेत.