
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एकदिवसीय ऑनलाईन “National Conference on Artificial Intelligence and Sustainable Digital Transformation in Commerce and Management” (NC-AISDTCM 2026) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन आज 9 जून 2026 रोजी करण्यात आले. या परिषदेत देशभरातील प्राध्यापक, संशोधक, आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने 50 हून अधिक सहभागी संशोधकांनी सहभाग नोंदविला.

यावेळी SSVPS धुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित अंशी संवाद साधताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला. त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आधुनिक आव्हाने, संधी आणि शाश्वत विकासासाठी डिजिटल परिवर्तनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री. वीरेंद्र सोनटक्के (Lead Product Manager, Mastercard, Pune) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी “The Intelligence That Scales: What AI is Doing to Commerce & What It Demands of You” या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. आपल्या भाषणात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात घडवून आणत असलेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला. ग्राहकांच्या गरजा ओळखणे, व्यवहारांचे विश्लेषण करणे, निर्णय प्रक्रिया अधिक अचूक करणे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढविणे यामध्ये AI ची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ. पराग नारखेडे, प्राचार्य, डी.एन.सी. महाविद्यालय, जळगाव यांनी “कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाणिज्य क्षेत्रातील बदलते स्वरूप” या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) ही आधुनिक वाणिज्य क्षेत्रातील क्रांतिकारी तंत्रज्ञान असल्याचे सांगितले. व्यवसायातील निर्णय प्रक्रिया अधिक परिणामकारक बनविण्यात AI ची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. नारखेडे यांनी ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट प्रणाली, ग्राहक सेवा, विपणन (Marketing) आणि डेटा विश्लेषण (Data Analytics) या क्षेत्रांमध्ये AI मुळे मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असल्याचे नमूद केले.
या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डिजिटल व्यवसाय, डेटा अॅनालिटिक्स, ई-कॉमर्स, सायबर सुरक्षा आणि शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर संशोधन निबंध सादर करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध तांत्रिक सत्रे, चर्चासत्रे आणि विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले. या चर्चांमधून सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील नव्या संधी आणि आव्हानांची सखोल माहिती मिळाली.
या परिषदेमुळे विद्यार्थी व संशोधकांना नवीन तंत्रज्ञान, संशोधनाच्या संधी आणि उद्योगक्षेत्रातील नव्या प्रवाहांची माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, आयोजन समिती, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले. सहभागी संशोधकना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.
परिषदेचे मुख्य संरक्षक म्हणून डॉ. उल्हास पाटील, परिषदेसाठी संरक्षक म्हणून डॉ. प्रशांत एस. वारके, डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. अनिल पी. डोंगरे, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. ए. पी. सरोदे आणि डॉ. सुषमा एस. पाटील, डॉ. माधुलिका सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
परिषदेची डॉ. चेतन सरोदे यांनी जबाबदारी सांभाळली. संयोजक म्हणून डॉ. प्राजक्ता आर. पाटील यांनी परिषदेचे नियोजन व समन्वय यशस्वीपणे पार पाडले, तर परिषद सचिव म्हणून प्रा. आफरीन खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आयोजन समितीमध्ये डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. चेतन बी. सरोदे, डॉ. प्राजक्ता आर. पाटील, प्रा. स्मिता एन. चौधरी, प्रा. वैजयंती पी. असोदेकर, प्रा. आफरीन वाय. खान, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दीपक दांडगे, प्रा. चारुशीला चौधरी, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. प्रशांत बाहेकर, प्रा. लीना पाटील, प्रा. मानसी अहिरे आणि प्रा. साक्षी पोलाखरे यांचा समावेश होता.



