राजकीय

भुसावळ राजकीय

भुसावळात काँग्रेस पदाधिकार्‍यांची निदर्शने

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी याची विटंबना करणार्‍यांविरूध्द कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले. हिंदू महासभेच्या पुष्पा शकून पांडे यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर गोळ्या झाडून विटबंना केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन हिंदू महासभेवर बंदी आणावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस कमेटीने शुक्रवारी निदर्शने केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, मोहन निकम, अनिता खरारे, शैलेश अहिरे, विजय तुरकुळे, रहिम मुसा कुरेशी, भगवान मेढे, अ‍ॅड. प्रमोद चव्हाण, जे. बी. कोटेचा, विलास खरात, संतोष साळवे, सलीम गवळी, […]

राजकीय

कुस्ती झाल्यास विजय आमचाच-ना. महाजन

जळगाव प्रतिनिधी । युती व्हावी ही आपली इच्छा आहे, तथापि, कुस्तीसाठी आम्ही तयार असून असे झाल्यास विजय आमचाच असल्याचा दावा आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ना. गिरीश महाजन यांनी राजकीय भाष्य केले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे, मात्र वेळ पडल्यास आम्ही लंगोट बांधून तयार राहू, असे वक्तव्य केले होते, यासंदर्भात ना. महाजन यांना आज विचारणा केली असता, गुलाबराव हे मोठे पहेलवान आहेत, ते नेहमी खिशात लंगोट घेऊन फिरतात. मात्र युती होणे न होणे हे माझ्या किंवा त्यांच्या हातात नाही, वरिष्ठ पातळीवर हे निर्णय होतील. […]

धरणगाव राजकीय

संजय महाजन भाजपचे संभाव्य उमेदवार तर पी.सीआबांचे काय?

पिंप्री खुर्द ता.धरणगाव : संतोष पांडे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात कुणाचे आव्हान कुणाला? या आशयचे वृत्त ‘लाइव्ह ट्रेंड्स’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. या वार्तापत्रात भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून संजय महाजन उमेदवार असतील असे भाकीत वर्तविले होते. जळगाव ग्रामीण मतदार संघात हे वार्तापत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. परंतु पी.सी. पाटील यांच्या समर्थकांच्या गोटात मात्र,चिंतेचे वातावरण पसरले. जर संजय महाजन विधानसभेचे उमेदवार असतील तर, पी.सी.आबांचे काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगायला सुरुवात झाली. दरम्यान, ‘लाइव्ह ट्रेंड्स’च्या या वार्तापत्राने मतदार संघातील राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडालेली आहे. सर्वत्र वातावरण पोषक असतांना देखील भाजपचे पी.सी.पाटील हे २०१४ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकले […]

अमळनेर राजकीय

अमळनेरचा भावी आमदार कोण?

अमळनेर : ईश्वर महाजन जळगाव जिल्ह्यात आघाडी असली तरी अमळनेर विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असा दावा कॉंग्रेसच्या जिल्हा प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी नुकताच अमळनेरमध्ये कार्यक्रमात केला होता. डॉ. पाटील यांच्या दाव्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात पडले आहेत. अमळनेरची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याचे निश्चित असतांना कॉंग्रेसकडून आलेले वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. कारण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, अजबराव पाटील यांच्या उपस्थितीतच डॉ.पाटील यांनी ही माहिती दिलीय. तसं बघितलं तर अमळनेरची जागा नैसर्गिकरित्या कॉंग्रेसची आहे. परंतु गतवेळी राष्ट्रवादीला कॉंग्रेसपेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला सुटण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे डॉ.पाटील यांच्या वक्तव्याला राजकीय […]

राजकीय राष्ट्रीय

आता म्हणे…अबकी बार चार सौ पार !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भाजपने आता आगामी निवडणुकीसाठी अबकी बार चार सौ पार ही नवीन घोषणा वापरण्याची तयारी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार मोदी सरकार ! ही घोषणा प्रचंड गाजली होती. याच घोषणेच्या माध्यमातून देशभरात परिवर्तनाचा जागर करून सत्ता संपादन करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला होता. आता आगामी निवडणुकीसाठी याच प्रकारच्या जबरदस्त पकड घेणार्‍या कॅचलाईन्सचा शोध घेतला जात आहे. या अनुषंगाने पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी आता अबकी बार चार सौ पार! ही नवीन घोषणा शोधून काढली आहे. त्यांनी ट्विटरवर याचा हॅशटॅगदेखील वापरण्यास प्रारंभ केला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये भूमिका मांडतांना अनुराग […]

पाचोरा राजकीय

युतीच्या कसरतीत दोन्ही पक्षांच्या समर्थकांची गोची !

पाचोरा गणेश शिंदे । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकल्याचे संकेत देतांनाच युतीबाबतचा सस्पेन्स शिगेला पोहचला आहे. आजची स्थिती पाहता युती झाली अथवा नाही झाली तरी दोन्ही स्थितींमध्ये भाजप व शिवसेना समर्थकांची गोची होणार असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतांना युती होणार की नाही ? हा आजचा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबतचा संभ्रम कायम असतांनाच दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील खूप बुचकळ्यात पडले आहेत. यातच शिवसेना पक्षप्रमुख १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथूनच लोकसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे तर या गोंधळात अजूनच भर पडली आहे. गत […]

जळगाव राजकीय राज्य

मुफ्ती हरून नदवी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) येथील समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्ध्यक्ष तथा प्रसिद्ध मुस्लीम धर्म गुरु मुफ्ती हरुन नदवी यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुफ्ती हे काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे वृत्त होते. जळगाव जिल्हा कॉंग्रेस भवनात आज दुपारी मुफ्ती हरून नदवी यांनी आज कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुफ्ती साहेब हे मुसलीम धर्म गुरु असल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. वर्षभर त्यांचे देशभरात प्रवचन होत असतात. त्यामुळे ते तरुणानांसह मुस्लिम धर्मातील प्रत्येक वयोगटात लोकप्रिय आहेत. मुफ्ती नदवी यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात कॉंग्रेसला मोठे बळ […]

अमळनेर राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनिल पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन

अमळनेर प्रतिनिधी । येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनिल भाईदास पाटील यांच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीचे समर्थन करण्यात आले. येथील राष्ट्रवादी काँग्रस कार्यालय येथे अमळनेर विधानसभा क्षेत्राची येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बँक संचालीका सौ तिलोत्तमा पाटील, डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत अनिल पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जोरदार समर्थन करून तेच उमेदवार असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत बूथ कमेटी सक्षम कशा होतील या बाबतीत चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले, जळगाव लोकसभेची उमेदवारी पक्षश्रेष्ठी अनिल भाईदास पाटील यांनाच देतील असा […]

चोपडा जळगाव राजकीय

देशातील कोणत्याही गरीब व्यक्तीला मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची गरज नाही : अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील

जळगाव (प्रतिनिधी) छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कर्जमाफीबाबत राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तीनही राज्यात सरकार आल्याच्या अवघ्या 48 तासांच्याआत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिपभैय्या पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष जळगाव जिल्हा डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील, माजी महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, राजस कोतवाल आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशात गरिबांसाठी किमान उत्पन्न योजना राबविण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली असून या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर देशातील एकाही गरीब व्यक्तीला आपल्या मुलभूत गरजांसाठी कोणावरही विसंबून राहण्याची […]

पाचोरा राजकीय

पाचोरा नगराध्यक्षांना खंडपीठाचा दिलासा

पाचोरा प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांना अपात्रता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. याबाबत वृत्त असे की, येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी वेळेस जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र घोषीत केले होते. २०१६च्या अखेरीस झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय नाथालाल गोहील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर विराजमान झाले होते. मात्र त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत तक्रार करण्यात आली होती. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पराभूत झालेले उमेदवारी अजय भास्कर अहिरे यांनी त्यांच्या विरूध्द जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली. या प्रकरणी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती […]