कृउबा समोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या गेट समोरून भाजी पाला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रमेश पुंडलिक चौधरी (वय-५६) रा. विठ्ठल पेठ हे कुटुंबियांसह राहतात.  ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने रमेश चौधरी हे जळगाव औरंगाबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दुचाकीने आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी (एमएच १९ बीएल ८४२३) पार्किंगला लावली होती. काम आटोपून सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरी परत जाण्यासाठी दुचाकीजवळ आले. त्यावेळी त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. आजूबाजू परिसरात दुचाकीचा शोधाशोध केली. परंतू दुचाकी मिळून आली नाही. रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॅा संजय धनगर करीत आहे. 

 

Protected Content