Home क्राईम भुसावळात तरूणावर चाकूहल्ला करणारे दोघे अटकेत

भुसावळात तरूणावर चाकूहल्ला करणारे दोघे अटकेत


bhusawal news 3

भुसावळ प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून दोघांनी एकाला चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी भुसावळ पोलीसात गुन्हा दाखल होता. यागुन्ह्यातील दोघांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील श्रीराम नगरजवळ फिर्यादी जिवन संजय देशमुख याचे संशयित आरोपी निलेश चंद्रकांत ठाकुर (वय-19) आणि निखील सुरेश राजपूत (वय-25) दोघे रा.दत्त नगर वांजोळा रोड भुसावळ येथे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर संशयित आरोपी निखिलने चाकू काढून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजार पेठ पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दोन्ही संशयित आरोपी शहरातील हे वांजोळा रोड श्रीराम नगर भागा मध्ये असल्याची माहिती मिळाली त्यानुसार दोन्ही संशयित निलेश ठाकुर आणि निखील राजपूर यांना गुरूवारी दुपारी अटक केली. याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोहेकॉ सुनिल जोशी, शंकर पाटील पो.ना. रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, पो.कॉ.विकास सातदिवे, कुष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत पाटील ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशानी केली आहे. पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहेत.


Protected Content

Play sound