तरसोद फाट्याजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन जण जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जखमी झाल्याप्रकरणी रविवार, २५ सप्टेंबर रोजी अज्ञात ट्रकचालकाविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी अक्षय वासुदेव कुकरेजा वय २४ हा त्याचा मित्र अमित पाहुजा याच्यासोबत दुचाकीने शनिवार, २४ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास नशीराबाद जळगाव या रस्त्याने येत होते. यादरम्यान तरसोद फाट्याजवळ टायर कंपनीच्या गोडावून समोर जळगावकडून येणाऱ्या ट्रकने अक्षय कुकरेजा याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अक्षय व दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र अमित पाहुजा हे दोन्ही रस्त्यावर फेकले जावून गंभीर जखमी झाले. घटनेत अमित पाहुजा याचा मोबाईल फुटून त्याचे नुकसान झाले. याप्रकरणी दुचाकीस्वार अक्षय कुकरेचा याच्या तक्रारीवरुन रविवारी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहेत.

Protected Content